राष्ट्रीय

नवरदेवाचा फक्त पाच दिवसांत कोरोनाने मृत्यू!

Pudhari News

भुवनेश्वर: पुढारी ऑनलाईन 

देशभरात कोरोनामुळे अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. अनेक करुण कथा समोर येत असताना भुवनेश्वर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका लग्न समारंभात नियम न पाळल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आणि पाच दिवसांतच नवरदेवाचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नसमारंभाला हजेरी लावलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाचा :  'पण नितीन गडकरीजी तुमचे बॉस ऐकणार का'?

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणाला लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत जीव गमवावा लागला आहे. त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या लग्नसोहळ्याला अनेक लोक उपस्थित होते. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंग पाळला नसल्याचे समोर आले आहे. या लग्नाला हजेरी लावलेल्या सर्वांचा शोध आता प्रशासन घेत असून त्यांची चाचणी केली जात आहे. 

वाचा : केजरीवालांवर भडकले परराष्ट्र मंत्री जयशंकर, द्वितीय संबंधांवर 'अशी' विधाने करू नका

राजकनिका पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात राहणाऱ्या संजय कुमार नायक याचा विवाह ११ मे रोजी पार पडला होता. तो आपल्या विवाहासाठी बेगलोरला आला होता. त्यावेळी त्याला ताप आणि कोविडची इतर लक्षणं जाणवत होती. विवाहानंतर लगेचच प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. नवरदेवाचा मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. 

संबधित तरुणाला घरीच क्वारंटाईन केले होते मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला भुवनेश्वरच्या एखा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  १५ मे रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लग्न सोहळ्यातील सर्वांचा शोध प्रशासन घेत आहे. नवरदेवाच्या घरातील सर्वांचे नमुने घेतले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. 

वाचा : कोरोना : जूनअखेर राज्यांना १० कोटी डोसेस मिळणार!

SCROLL FOR NEXT