धक्कादायक! हे प्रेम अजिबात नाही! चालत्या बाईकवर महिलेचे केस ओढले, तिला ठोसेही लगावले; (व्हिडिओ व्हायरल) file photo
राष्ट्रीय

धक्कादायक! हे प्रेम अजिबात नाही! चालत्या बाईकवर महिलेचे केस ओढले, तिला ठोसेही लगावले; (व्हिडिओ व्हायरल)

ही धक्कादायक घटना इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाली असून, लोक संतप्त झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

shocking incident bhubaneswar man assaults woman on moving bike video goes viral

पुढारी ऑनलाईन :

Bhubaneswar bike assault video : गाड्यांचे हॉर्न आणि ट्रॅफिकच्या गोंधळात भुवनेश्वरमध्ये चालत्या बाईकवर घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बाईक चालवणारा पुरुष मागे बसलेल्या महिलेचे केवळ मारहाणच करत नव्हता, तर तिचे केसही निर्दयपणे ओढत होता.

ही घटना पाहून इंटरनेटवरील लोक संतप्त झाले आहेत. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एक पुरुष आणि महिला बाईकवर जात होते. दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. अचानक तो पुरुष मागे बसलेल्या महिलेचे केस ओढू लागतो. हे तो प्रेमाने नव्हे, तर स्पष्टपणे रागात करत असल्याचे दिसते.

इतकेच नव्हे, तर तो बाईक चालवत असतानाच महिलेच्या डोक्यावर ठोसेही मारत होता. मात्र, महिला स्वतःचा बचाव करताना दिसत नाही; ती शांतपणे सगळे सहन करताना दिसते. मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने ही घटना रेकॉर्ड करून इंटरनेटवर टाकली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला.

व्हिडिओ काढला, पण मदत केली नाही

हा व्हिडिओ इंस्टाग्राम, यूट्यूब आणि X (ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. @gharkekalesh या X हँडलवरून ३ मे रोजी हा २४ सेकंदांची क्लिप शेअर करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी बाईकचा तपशील शोधून काढला. मात्र, ही बातमी लिहिताना पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी याला ‘टॉक्सिक रिलेशन’ म्हटले, तर काहींनी स्पष्टपणे सांगितले की हे प्रेम अजिबात नाही.

"पर्सनल मॅटर" म्हणून आपण किती दिवस दुर्लक्ष करणार?

अशा घटनांना अनेकदा ‘नवरा-बायकोचा’ किंवा ‘बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा’ वैयक्तिक वाद म्हणून लोक दुर्लक्ष करतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की तो पुरुष निर्भयपणे महिलेवर हात उचलत आहे, जणू त्याला कायद्याची किंवा समाजाची काहीच भीती नाही.

सर्वात वेदनादायक बाब म्हणजे आजूबाजूने अनेक गाड्या जात होत्या. लोक त्या महिलेवर होणारी मारहाण पाहत होते, पण कोणीही थांबून मदत केली नाही. कोणीही पुढे येऊन त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. आपण ‘नारी सन्मान’चे मोठे स्टेटस लावतो, पण प्रत्यक्षात एखादी महिला रस्त्यावर मार खात असताना आपण डोळेझाक करतो.

पोलिस फक्त चालान करतील की कारवाईही?

व्हिडिओमध्ये बाईकचा नंबर स्पष्ट दिसतो. आता प्रश्न असा आहे की ओडिशा पोलिस स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन त्या व्यक्तीला अटक करतील का, की लिखित तक्रारीची वाट पाहतील? हेल्मेट न घातल्यास चालान घरपोच येते, मग रस्त्यावर एका महिलेची प्रतिष्ठा तुडवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचू शकत नाहीत का?

महिलांवरील अत्याचार फक्त अंधाऱ्या गल्लीबोळात होत नाहीत, तर भरदिवसा सुद्धा होतात… कारण गुन्हेगारांना ठाऊक असते की ही ‘गर्दी’ फक्त तमाशा पाहील, पण मदत करणार नाही. तुमचे हे मौनच अशा गुन्हेगारांचे सर्वात मोठे शस्त्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT