Sanjay Raut Pudhari
राष्ट्रीय

Sanjay Raut on Party Split: साईबाबा, आई भवानीची शपथ घेऊन फुटीर झाले; व्हीप जारी केलाय मात्र... 'ऑ. टायगर'वर राऊत काय म्हणाले?

Anirudha Sankpal

Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेचे ७ खासदार फुटणार आहेत या बातमीला एकप्रकारे दुजोरा दिला. त्यांनी शिवसेनेचे खासदार ५० कोटी रूपयांनाच विकत घेतले जात आहेत असा दावा केला. मात्र याचबरोबर आमचे सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचं म्हणत उद्या बैठक बोलवली आहे असं देखील सांगितलं.

पक्षामुळं तुम्ही निवडून आलात

संजय राऊत यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत या खासदारांनी साईबाबांची, तुळजाभवानी आईची शपथ घेतल्याचं सांगत त्यांनी त्या बैठकीत ते आमच्यासोबतच होते असं सांगितलं. संजय राऊत यांनी ज्या खासदारांना दुसरीकडं जायचं आहे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि जावं कारण ते पक्षाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या कष्टामुळं निवडून आल्याचं सांगितलं.

ओमराजेंबाबत मोठा दावा

संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर हे देखील बंडखोर झाल्याबद्दल एक मोठा दावा केला. त्यांनी नुकतेच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागणार होता. त्यावेळी ओमराजेंना निकाल तुमच्या बाजूने लावतो सही करा असा दबाव आणल्याचा दावा केला. यामुळं आता पवनराजे हत्याकांड प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

पत्रकार परिषदेत अनिल देसाई यांनी व्हीप जारी केलेला आहे. उद्या बैठक बोलवली असून त्याला जर हे खासदार उपस्थित राहिले नाहीत तर उद्धव ठाकरेयांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अपशब्द वापराच त्याचबरोबर गेल्यावेळी देखील अशी फूट झाली होती. आम्ही शांत बसलो मात्र आता शिवसैनिक शांत बसणार नाही असं म्हणत इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT