Shivsena UBT Crisis pudhari
राष्ट्रीय

Shivsena UBT Crisis: ठाकरे गटाच्या बैठकीला तीच 'चार टकली'... राऊतांनी 'आले तेच शिवसैनिक' म्हणत मोठ्या कारवाईचे दिले सुतोवाच

Anirudha Sankpal

Shivsena UBT Crisis: अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाझे आणि संजय राऊत.... ऑपरेशन टायगर २.० ची कुणकुण लागल्यानंतर जेवढे खासदार ठाकरेंच्या बाजूला होते आता व्हिप जारी करून देखील तेवढेच खासदार बैठकीनंतरही आहेत. त्यामुळं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीला ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. या दोन खासदारांनीच ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याची बाब समोर आली होती. मात्र हे दोन्ही खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला हजेरी लावलेली नाही.

ठाकरे गटाचे दोन्ही बंडोखर खासदार बैठकीला आणण्यात ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्यांना अपयश आलं आहे. त्यामुळं मोठ्या नेत्यांची मध्यस्थी फसली का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

यानंतर बैठकीवेळी जे आले ते शिवसैनिक आणि जे आले नाहीत ते गद्दार असे म्हणत संजय राऊत यांनी कायदेशीर कारवाईचे सूतोवाच दिले आहेत. ते जे फितूर झाले ते सगळे गद्दार आहेत असं देखील म्हणाले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT