Shivraj Singh Chouha pudhari
राष्ट्रीय

Shivraj Singh Chouhan: शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक; टार्गेट वेळेआधीच पूर्ण, कृषी मंत्री शिवराज सिंहांची पोस्ट चर्चेत

शिवराज सिंह चौहान यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Anirudha Sankpal

Shivraj Singh Chouhan: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खात्याला एक टार्गेट दिलं होतं. ते टार्गेट आपण डेटलाईनच्या ५ महिने आधीच पूर्ण केल्याचे सांगितलं. त्यांनी हे टार्गेट पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील आभार मानले आहे.

टार्गेट ५ महिने आधीच पूर्ण

शिवराज सिंह चौहान आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'प्रिय शेतकरी भाऊ अन् बहिणींनो आजचा दिवस शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. एक स्वप्न साकार झाले आहे. एक संकल्प पूर्ण झाला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२७ पर्यंत ११ कोटी कृषी आयडी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं. मला हे सांगताना आनंद होतोय की आम्ही हे टार्गेट ५ महिने आधीच पूर्ण केलं आहे. आम्ही ११ कोटी कृषी आयडी कार्ड तयार केले आहेत. २३ ऑक्टोबरच्या रात्री ११ कोटी कृषी कार्ड तयार करण्यात आले आहेत.'

शेतकऱ्यांचे मानले आभार

शिवराज सिंह चौहान आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, 'या कृषी कार्डच्या माध्यमातून अनेक योजानांचा लाभ पारदर्शक पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळणार आहे. बँकेकडून कर्ज घेणे असो किंवा पीक विमा योजनेचा लाभ असो, किंवा इतर संकट काळातील पॅकेजची रक्कम असो. ती मिळण्यासाठी हे कृषी कार्ड पुरेसे ठरणार आहे. यामुळं योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणे शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना शेती करताना उपयोगी पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT