शिवसेना शिंदे गटाचे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिकृत समर्थन Pudhari Photo
राष्ट्रीय

शिवसेना शिंदे गटाचे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिकृत समर्थन

Delhi Assembly Election |उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपाला समर्थन दिले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून समर्थन दिले आहे. शिंदे यांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्र मंगळवारी (दि.२१) शिवसेना शिंदे गटाने भाजपला सुपूर्द केले.

एकनाथ शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवर कार्यरत आहे. या वारशाचे अनुसरण करून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एनडीएचे सक्रिय सदस्य आहोत आणि आम्हाला याचा अभिमान आहे. शिवसेनेने दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील शिवसेना कार्यकारिणीला भाजपच्या सोबत जुळवून घेण्याचे आणि निवडणूक प्रचारात सक्रियपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, राज्यातील महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मात्र दिल्ली निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अजित पवार यांच्या पक्षाने ४१ उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT