Congress leader Shashi Tharoor praised the female forest officer who caught a king cobra, watch the video
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी केरळमधील एका 18 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडणार्या महिला वनकर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना केरळमधील पृतीपल्ली रेंज या जंगल परिसरात घडली, जिथे केरळ वनखात्यामधील महिला वनकर्मचारी जिएस रोशनी यांनी अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने या प्रचंड आकाराच्या विषारी सापाला पकडले.
हा किंग कोब्रा पकडताना व्हिडीओ क्लिप एक्स युजर राजन मेढेकर यांनी पोस्ट केली होती ती चांगलीच व्हायरल झाली. हा व्हिडीओ शेअर करत थरूर यांनीही ही क्लिप शेअर केला आहे.‘वन अधिकारी रोशनी यांनी दाखवलेले अद्भुत धाडस आणि क्षमता कौतुकास्पद आहे! केरळ सरकारला त्यांच्या अनुकरणीय सेवेची योग्य दखल घेण्याचे मी आवाहन करत आहे. अशी कॅप्शन देत थरुर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे..
त्या धाडसी वन अधिकाऱ्याने त्या मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्याला पकडले. व्हायरल क्लिपमध्ये ती किंग कोब्राला सहजतेने पकडताना दिसत होती. "१८ फूट लांबीचा हा किंग कोब्रा पाहूनही पारुथीपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट ऑफिसर रोशनी डगमगल्या नाहीत! असे ही क्लिप शेअर करणाऱ्या राजन मेढेकर यांनी म्हटले आहे.
सध्या पावसाळा सरु असल्यामुळे पश्चिम घाटामधील अनेक गावांमध्ये किंग कोब्रा दिसण्याचे प्रकार वाढले आहे. अत्यंत विषारी असलेल्या या सापाच्या दंशामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागते. त्यामुळे केरळचे वनखाते याबाबत दक्षता घेऊन, असे साप नागरी भागात किंवा गावखेड्यात दिसल्यास रेस्कू करत असते. आकाराने १० ते २० फूट लांबी असते. तसेच याचे वैषिठ्य म्हणजे हा स्वजातभक्षक असतो. धामण, नाग, इत्यादी साप हे याचे खाद्य असते.