नवी दिल्ली : दिल्लीत मराठी जणांचा सन्मान होतो आणि त्या कार्यक्रमासाठी शरद पवार गेले. हे शरद पवारांच्या स्टेटसमनशीपचे उदाहरण आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लावणे योग्य नाही, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले.
मंगळवारी दिल्लीत एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. यानंतर संजय राऊत यांनी यावर चांगलेच तोंडसुख घेतले. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्या भाषेच्या होणाऱ्या गौरवावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली तेव्हा आमच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
संजय राऊत यांनी हे देखील पाहायला हवे तसेच संजय राऊत यांच्या एका विधानाने महाविकास आघाडी तुटेल असे कोणी वाटून घेण्याची गरज नाही. जर असे कोणाला वाटत असेल तर ते त्यांचे दिवास्वप्न असेल, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी विरोधकांनाही टोला लगावला.