नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, मुंबईसह देशातील १० शहरात लवकरच 'स्फुटनिक व्ही' लस उपलब्ध होणार आहे. या लसीची भारतात निर्मिती करीत असलेल्या डॉ रेड्डीज लॅबरोटरीजने ही माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या (आरडीआयएफ) सहकार्याने डॉ. रेड्डीज लॅब भारतात कोरोनावरील स्फुटनिक व्ही लसीची निर्मिती करीत आहे.
अधिक वाचा : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना एनआयएकडून अटक
ज्या प्रमुख शहरात ही लस उपलब्ध केली जाणार आहे, त्यात कोल्हापूर, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली, विशाखापट्टणम, बड्डी आणि मिरयालगुडा यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : सीबीएसईकडून इयत्ता १२ वीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला! राज्य मंडळही त्याच मार्गाने जाणार?
आगामी काळात आणखी काही शहरात ही लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही डॉ रेड्डीजकडून सांगण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्फुटनिक व्ही लस केवळ हैदराबाद शहरात उपलब्ध होती.