ओडिशामधील पुरी येथे जगन्‍नाथ रथयात्रेच्‍या पहिल्‍या दिवशी भाविकांच्‍या प्रचंड गर्दीमुळे रथाने केवळ ७५० मीटर अंतर पार केले.  
राष्ट्रीय

Jagannath Rath Yatra : पुरी जगन्‍नाथ यात्रेत चेंगराचेंगरी, ६०० जखमी, ८ अत्‍यवस्‍थ

भाविकांच्‍या प्रचंड गर्दीमुळे पहिल्‍या दिवशी रथाने पार केले केवळ ७५० मीटर अंतर, शनिवारी सकाळी दहापासून पुन्‍हा सुरु होणार रथयात्रा

पुढारी वृत्तसेवा

Jagannath Rath Yatra | ओडिशामधील पुरी येथे जगन्‍नाथ रथयात्रेदरम्‍यान शुक्रवारी (दि. २७ जून) रात्री रथ ओढताना चेंगराचेंगरी झाली. यामध्‍ये ६०० भाविक जखमी झाले असून, यातील ८ जण अत्‍यवस्‍थ आहेत. जखमी भाविकांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, भाविकांच्‍या प्रचंड गर्दीमुळे पहिल्‍या दिवशी रथाने केवळ ७५० मीटर अंतर पार केले. आज (दि. २८ जून) रथ यात्रेच्‍या दुसर्‍या दिवशी सकाळी दहावाजल्‍यापासून पुन्‍हा एकदा रथ यात्रा सुरु होणार आहे.

शुक्रवारी रथ यात्रेच्‍या पहिल्‍या दिवशी रात्री देवी सुभद्राच्या रथाभोवती गर्दी वाढली. यावेळी झालेल्‍या चेंगराचेगंरीत ६२५ भाविकांची प्रकृती खालावली. अनेकजण बेशुद्ध पडले. ७० भाविकांना जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनीसोंगितले की, 'भगवान बलभद्रचा रथ वळणावर अडकल्याने विलंब झाला. त्यामुळे देवी सुभद्राचा रथ मरीचकोट येथे थांबवावा लागला. सूर्यास्त झाल्यामुळे रात्री ८ वाजता तिन्ही रथ थांबवण्याची घोषणा करण्यात आली.'

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बलभद्रचा रथ सर्वात पुढे होता. देवी सुभद्राचा रथ फक्त ७५० मीटरपर्यंत पोहोचू शकला. भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ मुख्य मंदिराबाहेर उभा आहे. ते फक्त एक मीटर हलू शकत होते. भगवान बलभद्र यांचा रथ मुख्य मंदिरातून शुक्रवारी दुपारी ४:०८ वाजता काढण्यास सुरुवात करण्यात आली. मुख्य मंदिरापासून २.६ किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात ९ दिवस राहिल्यानंतर भगवान ५ जुलै रोजी मुख्य मंदिरात परततील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT