LOC infiltration threat | सात दहशतवादी लाँच पॅड ‘एलओसी’पलीकडे सक्रिय; काश्मीरमध्ये घुसखोरीचा धोका file photo
राष्ट्रीय

LOC infiltration threat | सात दहशतवादी लाँच पॅड ‘एलओसी’पलीकडे सक्रिय; काश्मीरमध्ये घुसखोरीचा धोका

संपूर्ण सीमाभागात सैन्य हाय अलर्टवर

पुढारी वृत्तसेवा

अनिल साक्षी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘एलओसी’पलीकडे सात दहशतवादी लाँच पॅड पुन्हा सक्रिय झाले असून, तेथून मोठ्या प्रमाणात घुसखोरी घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सीमाभागातील बर्फ वितळू लागल्यामुळे येत्या काही दिवसांत घुसखोरीचे प्रयत्न अधिक वाढू शकतात. विशेषतः, उन्हाळ्याच्या हंगामात डोंगराळ मार्ग खुले होत असल्याने दहशतवादी संघटना या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

200 दहशतवाद्यांची उपस्थिती?

सुमारे 50 दहशतवाद्यांना नव्याने सक्रिय करण्यात आलेल्या लाँच पॅडवर हलविण्यात आले असून, आणखी जवळपास 150 दहशतवादी ‘एलओसी’ आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरील तळांमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्याचे निर्देश

संभाव्य घुसखोरीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना उच्चस्तरीय सतर्कता राखण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT