पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याहून परतणार्या आंध्र प्रदेशातील प्रवासी बसला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात सात भाविक ठार झाले आहेत. जबलपूरमधील मोहला-बर्गीजवळ आज (दि. ११) सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आंध्र प्रदेशमधील भाविक महाकुंभसाठी प्रयागराजला गेले होते. आज सकाळी ते बसने परतीचा प्रवास करत होते. मोहला-बर्गीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर ट्रकने बसला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, सात भाविक जागीच ठार झाले. जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.