नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात असतील. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
अधिक वाचा : नोंदणी सुरु होताच CoWIN सर्व्हर काही मिनिटांमध्येच सपशेल गंडला
दरम्यान, कोविड-१९ लसीच्या किमतीवरून मोठी चर्चा होत आहे. याच दरम्यान सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया अर्थात आज (दि.२८) कोविशील्ड लसीच्या किमतीत घट केली आहे. पुणेस्थित सीरमने आपल्या 'कोविशील्ड' लसीची राज्य सरकारांसाठीची किंमत ४०० रुपये प्रति डोस निश्चित केली होती. आत ही लस ३०० रुपये प्रति डोस असेल. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी ट्विटकरून याची माहिती दिली.
अधिक वाचा : सीरमची 'कोविशिल्ड' राज्यांसाठी १०० रुपयाने स्वस्त!
देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण खुले केले जाणार आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते. आता केंद्राच्या या निर्देशाला सीरमने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अधिक वाचा : शिष्टाचारात वेळ वाया गेला नाही, उपयुक्त बैठक; आनंद महिंद्रांना सीएम ठाकरेंबरोबरची बैठक भावली