Sukanya Samriddhi Yojana  Pudhari Photo
राष्ट्रीय

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सुरक्षित गुंतवणूक करा, जाणून घ्या 'सुकन्या समृद्धी योजने'विषयी

Sukanya Samriddhi Yojana | पालकांसाठी आपल्या मुलीच्या भविष्याचा आर्थिक पाया भक्कम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

मोनिका क्षीरसागर

मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद सहज करता यावी यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana - SSY) ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. सध्या या योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज मिळते आणि आयकरातही सूट मिळते. प्रति महिना फक्त 250 रुपये भरून देखील हे खाते उघडता येते.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची छोटी बचत योजना असून ती "बेटी बचाओ, बेटी पढाओ" अभियानाअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी पालकांना आर्थिक मदत करणे हा आहे. सुकन्या समृद्धी योजना ही पालकांसाठी आपल्या मुलीच्या भविष्याचा आर्थिक पाया भक्कम करण्याची सुवर्णसंधी आहे. सुरक्षित, करसवलतीसह आणि सरकारच्या हमीची ही योजना प्रत्येक पालकाने विचारात घ्यावी.

योजनेची 'ही' आहेत उद्दिष्ट

  • मुलगा-मुलगी भेदभाव नष्ट करणे

  • गर्भलिंग निदान थांबवणे

  • मुलींच्या शिक्षणात आणि इतर क्षेत्रांत सहभाग वाढवणे

  • मुलींच्या सुरक्षेची खात्री देणे

योजनेच्या मुख्य वैशिष्ट्यांचा आढावा

व्याजदर : 8.2% (तिमाही बदल होऊ शकतो)

करसवलत : कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखपर्यंत सूट

गुंतवणूक मर्यादा : किमान 250 रूपये आणि कमाल 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष

सुरक्षा : सरकारची हमी असलेली, जोखीममुक्त योजना

लाभार्थी : 10 वर्षांखालील मुलींसाठी

खाते उघडण्याचे नियम

  • मुलीचे वय खाते उघडताना 10 वर्षे किंवा त्याखाली असावे.

  • एका कुटुंबात फक्त 2 मुलींसाठी खाते उघडता येते.

  • जुळ्या मुली असतील तर विशेष परिस्थितीत तिसऱ्या मुलीसाठीही खाते उघडता येते.

  • खाते पालक किंवा कायदेशीर पालकच उघडू शकतात.

पैसे भरण्याचे नियम

  • दरवर्षी 250 ते 1.5 लाखांपर्यंत रक्कम जमा करता येते.

  • 15 वर्षे सलग पैसे जमा करणे आवश्यक आहे.

  • पुढील 6 वर्षे पैसे न भरता देखील त्यावर व्याज मिळते.

  • खाते 21 वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होते.

आवश्यक कागदपत्रे

  • भरलेला फॉर्म

  • मुलीचा जन्म दाखला

  • पालकांची ओळखपत्रे (आधार, पॅन, पासपोर्ट)

  • पत्त्याचा पुरावा

  • पासपोर्ट साइज फोटो

पैसे कधी आणि कसे काढता येतील?

  • 18 वर्षांनंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते (शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक)

  • 18 वर्षांनंतर मुलीचे लग्न असल्यास पूर्ण खाते बंद करून पैसे मिळू शकतात

  • 21 वर्षांनंतर खाते पूर्ण परिपक्व होऊन संपूर्ण पैसे मिळतात आणि ते पूर्णतः करमुक्त असतात

खाते कसे उघडावे?

  • जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्म भरून खाते उघडता येते.

  • फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करून प्रिंट घेऊनही सबमिट करता येतो.

  • खाते उघडल्यानंतर ते ऑनलाईन ऑपरेट करता येते, पण उघडण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे.

किती रक्कम मिळेल? (उदाहरण)

  • खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत ट्रान्सफर कसे करावे?

  • संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन Account Transfer Form आणि KYC Documents द्या.

  • खात्याची वैधता तपासून अधिकारी ट्रान्सफरला मंजुरी देतील.

  • मग संबंधित बँकेत जाऊन खाते सुरू करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना – मासिक गुंतवणूकनुसार मिळणारा परतावा

Sukanya Samriddhi Yojana

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT