काँग्रेसने सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.  Congress x
राष्ट्रीय

सेबी प्रमुखांवर काँग्रेसचा पुन्हा गंभीर आरोप : ६ कंपन्यांकडून पैसे कमावले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. बुच यांचा उल्लेख करत काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंगळवारी (दि.१०) काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दावा केला की, माधबी पुरी यांच्या खात्यात कधी आणि किती पैसे आले याची माहिती आयसीआयसीआय बँकेने दिली आहे. ते म्हणाले की, सेबी किंवा पीएमओने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. (Congress on SEBI)

पवन खेडा म्हणाले की, आज आम्ही आणखी एक खुलासा करत आहोत. हिंडनबर्गच्या अहवालात अगोरा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेडचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. माधबी पुरी यांनी नंतर सांगितले की, जेव्हा ती सेबीकडे गेली तेव्हा तिची कंपनी निष्क्रिय झाली. पवन खेडा यांनी एक कागद दाखवला आणि दावा केला की 31 मार्च 2024 पर्यंत या कंपनीत त्यांचे 99 टक्के हिस्सेदारी आहे. सरकारकडे बोट दाखवत पवन खेडा म्हणाले की, सरकारला राहुल गांधी आणि खर्गे यांच्यातील फोन कॉल्सची माहिती आहे, परंतु माधबी पुरी यांच्या खोटेपणाबद्दल माहिती नाही. ते म्हणाले की, माधबी पुरीने अनेक गोष्टी जाणूनबुजून लपवल्या आहेत. (Congress on SEBI)

6 कंपन्यांकडून पैसे कमावल्याचा आरोप

पवन खेडा पुढे म्हणाले की, या सगळ्यातून एक प्रश्न पडतो की अगोराकडून कोणत्या कंपन्यांची सेवा घेतली? या कंपन्या सेबीच्या स्कॅनरखाली आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ते म्हणाले की 2016-17, 19-20 आणि 23-24 मध्ये माधबी पुरीने अगोराद्वारे 2.95 कोटी रुपये कमावले. हा पैसा महिंद्रा अँड महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, पिडीलाइट, आयसीआयसीआय, सॅम्बकॉर्प आणि व्हिज्युलॉजी अँड फायनान्स या 6 कंपन्यांकडून कमावला गेला. खेडा म्हणाले की, या सर्व कंपन्या SEBI द्वारे सूचीबद्ध आणि नियमन केलेल्या आहेत आणि त्या सर्व अगोराच्या ग्राहक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT