पुढारी ऑनलाईन: माधवी पुरी बूच या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्ष आहेत. सेबी अध्यक्षपदावर वर्णी लागणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या तरी सध्या मात्र त्या वादात अडकल्या आहेत. विदेशातील उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहातील त्यांची गुंतवणूक आणि आयसीआयसीआयसह अन्य सहा कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप झाल्यामुळे माधवी आणि त्यांचे पती धवल बूच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ऑगस्ट २०२४ मध्ये हिंडेनबर्गचा खळबळजनक अहवाल प्रसारित झाला. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपनीमध्ये बूच यांची गुंतवणूक असल्याचा आरोप आहे. सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी बूच यांचे पती धवल बूच यांनी विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील संपूर्ण नियंत्रणाचे अधिकार पत्नीस बहाल करण्याची मागणी केली होती.
बूच यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. सेबीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच बूच यांनी आयसीआयसीआय बँकेकडून पैसे स्वीकारल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला आहे. याशिवाय अन्य सहा कंपन्यांकडूनही बूच दाम्पत्याने पैसे घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
महिंद्रा समूहासह अन्य सहा कन्सल्टन्सी कंपन्यांचे लवाद मार्गी लावताना बूच यांनी पैसे अगोरा अॅडव्हायझरी, महिंद्रा, रेड्डीज, पीडिलाईट, सेम्बकॉर्प, व्हिसू लिजिग, आयसीआयसीआय आदिंचा समावेश आहे. यातील काही कंपन्यांनी तज्ज्ञ (कन्सल्टंट) म्हणून बूच यांना पेमेंट केल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसकडून आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आमच्या आयकर विवरणपत्राची अवैधरीत्या माहिती घेऊन चुकीचे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा बूच दाम्पत्याने केला.
सेबीमधील ५०० अधिकाऱ्यांनी पत्र लिहून बूच यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदविला आहे. सेबीच्या व्यवस्थापनाने मात्र बाह्य घटकांकडून अशा प्रकारचे पत्र व्हायरल केल्याचे स्पष्ट करीत बूच यांची पाठराखण केली आहे.
आयसीआयसीआय बँकेने मात्र बूच यांना कोणत्याही प्रकारचे पेमेंट केले नसल्याचे म्हटले १७ आहे. २०१७ ते २०२४ या काळात बूच यांच्या खात्यावर आयसीआयसीआयकडून १७ कोटी वेतन जमा झाल्याचा आरोप खेरा यांनी केला आहे
बूच यांचे पती धवल यांनी २०१९ ते २०२४ या काळात महिंद्रा आणि महिंद्रा ४.७८ समूहाकडून घेतल्याचा नवा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. कोटी महिंद्राकडून मात्र हा आरोप फेटाळण्यात आला आहे.