...आता UPSC परिक्षेतील फसवणूकीला बसणार चाप File Photo
राष्ट्रीय

UPSC Exam System |'युपीएससी' परीक्षा पद्धतीमधील पारदर्शकता वाढणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून प्रशिणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची निवड चर्चेत आहे. या प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि निवड प्रक्रियेवरच सवाल केले जात होते. यानंतर आयोगाने कठोर पाउल उचलत खेडकर यांचे प्रशिक्षण स्‍थगित केले आहे. तसेच त्यांना नोटीसही बजावली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आता परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता आणखी वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी आयोगाकडून योजना

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आता आपल्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची योजना आखत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील अयोग्य मार्ग आणि 'तोतयागिरी' थांबवण्यासाठी आधार-आधारित फिंगरप्रिंट प्रमाणीकरण, उमेदवार चेहऱ्याची ओळख पटवणारे सॉफ्टवेअर आणि वास्तविक AI आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) CCTV पाळत ठेवण्याची UPSC योजना आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

वादग्रस्त IAS अधिकाऱ्याकडून मर्यादेच्या पलीकडे फसवणूक

वादग्रस्त IAS अधिकाऱ्याने "तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे छायाचित्र/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे फसवणूक केली," असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.

वर्षभरात यूपीएससी 'इतक्या' परीक्षा घेते

केंद्रीय लोकसेवा आयोग एका वर्षाच्या कॅलेंडरमध्ये एक घटनात्मक संस्था म्हणून केंद्र सरकारमधील गट 'अ' आणि गट 'ब' च्या पदांसाठी १४ प्रमुख परीक्षा, अनेक भरती चाचण्या आणि मुलाखतीचे आयोजन करते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) परीक्षांदरम्यान तोतयागिरी, फसवणूक आणि फसवणूक विरुद्ध उपाययोजना करण्यासाठी नवीनतम डिजिटल बायोमेट्रिक तंत्रज्ञानासाठी निविदा मागवल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT