SBI Recruitment 2026:
नवी दिल्ली : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) २ हजारहून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. देशभरातील १६ सर्कल्समध्ये 'सर्कल बेस्ड ऑफिसर्स' (CBO) पदांची नियुक्ती केली जाईल. जाहिरातीनुसार, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ जानेवारी पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ibpsreg.ibps.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.
बँकेने खालील राज्यांमध्ये ही भरती जाहीर केली आहे:
महाराष्ट्र: १९४ पदे
महाराष्ट्र आणि गोवा: १४३ पदे
कर्नाटक: २०० पदे
उत्तर प्रदेश: २०० पदे
पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम: २०० पदे
गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव: १९४ पदे
तामिळनाडू, पाँडिचेरी: १६५ पदे
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड: ९७ पदे
राजस्थान: १०३ पदे
इतर राज्ये: (आंध्र प्रदेश-९७, ओडिशा-८०, तेलंगणा-८०, केरळ-५० इत्यादी)
शिक्षण: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट यांसारखी पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
वय: उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. वयाची गणना ३१ डिसेंबर २०२५ च्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
एकूण पदे: २२७३
अर्ज करण्याची मुदत: २९ जानेवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६.
पगार: निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी ४८,४८० ते ८५,९२० रूपये दरम्यान असेल. यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन ४८,४८० रूपये असेल.
अर्ज शुल्क
सामान्य/OBC/EWS: ७५० रुपये.
SC/ST/PH: कोणतीही फी नाही (निशुल्क).
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पूर्ण होईल: १. लेखी परीक्षा २. स्क्रीनिंग ३. मुलाखत ४. स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी
१. सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibpsreg.ibps.in ला भेट द्या.
२. 'Current Openings' विभागात SBI CBO भरती लिंकवर क्लिक करा.
३. जर तुम्ही नवीन असाल, तर ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून Registration करा.
४. मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करा.
५. तुमची सर्व माहिती (नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता इ.) काळजीपूर्वक भरा.
६. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
७. तुमच्या प्रवर्गाप्रमाणे फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.