Bank Jobs 2026 Pudhari
राष्ट्रीय

Bank Jobs 2026: फ्रेशर्ससाठी बँकेत 12 हजारांहून अधिक नोकऱ्या; SBI-BOB मध्ये भरती, किती मिळणार पगार? काय असणार काम?

Bank Apprentice Recruitment 2026: SBI आणि बँक ऑफ बडोदा यांनी मिळून 12 हजारांहून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. फ्रेशर्स उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bank Apprentice Recruitment 2026: बँकेत करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. State Bank of India (SBI) आणि Bank of Baroda (BOB) यांनी मिळून 12 हजारांहून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, फ्रेशर्स उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.

जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात सुरुवात करायची असेल आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा असेल, तर अप्रेंटिसशिप हा चांगला पर्याय ठरू शकतो.

बँक अप्रेंटिस म्हणजे नेमकं काय?

बँक अप्रेंटिस ही कायमस्वरूपी नोकरी नसून एक प्रशिक्षण (Training Program) आहे. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेतील दैनंदिन कामकाज, ग्राहक सेवा, कागदपत्र तपासणी, खाते उघडण्याची प्रक्रिया, KYC आणि बँकिंग सॉफ्टवेअरचा वापर याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं. या काळात वरिष्ठ अधिकारी उमेदवारांना मार्गदर्शन करतात आणि बँकिंग सिस्टीमची सखोल माहिती दिली जाते.

अप्रेंटिसला कोणती कामं शिकवली जातात?

अप्रेंटिस म्हणून निवड झाल्यानंतर उमेदवारांना सुरुवातीची बँकिंग कामं शिकवली जातात. यामध्ये:

  • ग्राहकांना खाते उघडणे, फॉर्म भरणे यासाठी मदत करणे

  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सहाय्य करणे

  • KYC आणि अकाउंटशी संबंधित कामं समजून घेणे

  • बँक ब्रांच ऑपरेशन, टोकन सिस्टम आणि बेसिक डेटा एंट्री शिकणे

  • ATM, पासबुक, ऑनलाइन व्यवहारांबाबत ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देणे

पात्रता काय आहे?

बँक अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • किमान वय: 20 वर्षे

  • कमाल वय: 28 वर्षे
    आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

पगार किती मिळणार?

अप्रेंटिस प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिला जातो. साधारणपणे एका वर्षाच्या प्रशिक्षण काळात 15,000 रुपये प्रतिमहिना मानधन मिळू शकतं. मात्र, इतर सरकारी भत्ते किंवा सुविधा मिळत नाहीत.

BOB Apprentice Vacancy 2026

Bank of Barodaमध्ये 5000 अप्रेंटिस पदांसाठी भरती

  • रिक्त पदे: 5000

  • प्रशिक्षण कालावधी: 12 महिने

  • अर्ज सुरू: 19 मे 2026

  • शेवटची तारीख: 8 जून 2026

  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे

BOB Appretice Vacancy 2026 Notification PDF

SBI Apprentice Vacancy 2026

State Bank of India ने 7150 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

  • रिक्त पदे: 7150

  • प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष

  • अर्ज सुरू: 19 मे 2026

  • अर्जाची अंतिम तारीख: 8 जून 2026

SBI Apprentice Vacancy 2026 Short Notice

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि स्थानिक भाषेच्या चाचणीच्या आधारे केली जाईल. काही बँका गुणवत्ता यादी (Merit List) आधारित निवडही करू शकतात. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT