Samsung Vs Apple Tim Cook pudhari
राष्ट्रीय

Samsung Vs Apple Tim Cook: सॅमसंगच्या 'टीम कूक' यांनी Galaxy Z Fold 8 चं केलं प्रमोशन; Apple ला चांगलंच डिवचलं

Anirudha Sankpal

Samsung Vs Apple Tim Cook: सॅमसंग आणि अॅप्पल या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुफान ट्रोलिंग सुरू असतं. यावेळी सॅमसंगने अत्यंत आश्चर्यकारक आणि मजेदार जाहिरात केली आहे. या जाहिरातीद्वारे नुकतेच आपला पहिला फोल्ड फोन बाजारात आणणाऱ्या Apple ला ट्रोल केलं. या जाहिरातीत टीम कूक हे अॅपलला नाही तर Samsung Galaxy Z Fold 8 ला पाठिंबा देत आहेत. हे ऐकल्यावर सर्वांना वाटतं की अॅप्पलचे माजी सीईओ टीम कूक हे सॅमसंगमध्ये गेले आहेत. मात्र तसं नाहीये पूर्ण जाहिरात पाहिल्यानंतर यामागची मजेशीर गोष्ट समोर येते.

टीम कूक यांनी सॅमसंग मोबाईल केला प्रमोट

सॅमसंगच्या जाहिरातीवर नजर टाकली तर त्यांचा मोबाईल प्रमोट करणारे टीम कूक हे अॅप्पलचे सीईओ नसून ते दुसरेच टीम कूक आहेत. मात्र जाहिरातीत दिसणारे टीम कूक यांनी अॅप्पलच्या टीम कूक यांच्यासारखे कपडे घातले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांचेही नाव टीम कूक आहे. ते न्यूझीलंडचे पामर्स्टन नॉर्थचे रहिवासी आहेत.

न्यूझीलंडच्या या टीम कूक यांनी अॅपलच्या टीम कूक यांच्यासारखे कपडे घातल्याने लोकांना आश्चर्य वाटलं. जाहिरातीच्या व्हिडिओत त्यांनी चष्मा घातला होता. ते जाहिरातीत म्हणतात की हाय मी टीम कूक फ्रॉम पाल्मी

हा टीम कूक Galaxy Z Fold 8 चा रिव्ह्यू करतो

सॅमसंग न्यूझीलंडच्या या जाहिरातीत टीम कूक नावाचा व्यक्ती Galaxy Z Fold 8 चा रिव्ह्यू करताना दिसतो. त्याच्या जोडीला तो अॅपलच्या जाहिरातीत वापरण्यात येणाऱ्या भाषेची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. या जाहिरातीत तो Galaxy Z Fold 8 ची गुणगाण गात हा फोन सर्वात चांगला आहे असं सांगतो.

सॅमसंगचा लेटेस्ट फोल्ड फोन

सॅमसंगने नुकतेच Samsung Galaxy Z Fold 8 आणि Fold 8 Pro लाँच केले होते. ९ सप्टेंबरला अॅप्पलने देखील आपला पहिला फोलेड स्मार्टफोन बाजारात लाँच केला. त्याचे नाव iPhone Duo असं आहे. कंपनीला या मोबाईलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याची सुरूवातीची किंमत ही २ लाख ९९ हजार ९०० रूपये ठेवण्यात आली आहे.

सॅमसंगने २०१९ मध्ये लाँच केला होता पहिला फोन

सॅमसंगने आपला पहिला फोल्डेबल फोन २०१९ मध्ये लाँच केला होता. त्यानंतर सॅमसंगने आपले अनेक फोल्डेबल हँडसेट लाँच केले आहेत. सध्याच्या घडीला सॅमसंगचा सर्वात लेटेस्ट फोल्ड सीरिज Galaxy Z Fold 8 सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT