पुढारी ऑनलाईन डेस्क: Chhattisgarh Naxal attack | दंतेवाडामध्ये संयुक्त मोहिम राबवून परतताना नक्षल्यांनी भारतीय जवानांचा घातपात केला. कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. हा भ्याड हल्ला आज दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झाला. यामध्ये दंतेवाडा डीआरजीचे ८ जवान आणि एक ड्रायव्हर शहीद झाले. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स ( X ) पोस्ट केली आहे. यामध्ये शाह यांनी म्हटले आहे की," छत्तीसगडमधील बिजापूर येथे झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धाजली वाहिली आहे".
पुढे "हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. पण आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. तसेच मार्च 2026 पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू, असे देशवासियांना आश्वस्त देखील गृहमंत्री शाहा यांनी केले आहे.
रविवारी पखंजूरमध्ये सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. आज पंखजूर येथून नक्षलविरोधी संयुक्त मोहिम राबवून जवान परतत होते. नक्षलवाद्यांनी बिजापूरच्या कुत्रू रोडवर जवानांच्या वाहन आयईडीचा स्फोटने उडवले. दंतेवाडामध्ये संयुक्त मोहिम राबवून हे जवान छावणीत परत येत होते. यावेळी हा स्फोट घडवून आणल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अनेक डीआरजी कर्मचारी पिकअपमध्ये होते. असे सांगितले जात आहे की, आयईडी हा सुमारे तीन किलो वजनाचा स्फोटक होता. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवानांच्या वाहनाचे तुकडे झाले. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.