RSS चा भारतमातेसाठी असलेला संकल्प आणि समर्पण प्रेरणादायी; PM मोदी Pudhari Photo
राष्ट्रीय

RSS चा संकल्प आणि समर्पण प्रेरणादायी; PM मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज (दि.१२) वर्धापनदिन. संघ (RSS) आज ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत पदार्पण करत आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरएसएस स्वयंसेवकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पीएम मोदी यांनी या संदर्भातील एक्स पोस्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रसेवेला समर्पित असलेला संघ आज १००व्या वर्षात पदार्पण करत आहे. अविरत यात्रेच्या या ऐतिहासिक मैलाच्या दगडावर सर्व स्वयंसेवकांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा".

मोहन भागवत यांचे भाषण अवश्य ऐकावे, PM मोदी

भारतमातेसाठीचा 'हा' संकल्प आणि समर्पण देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारा आहे आणि 'विकसित भारत' साकारण्यात नवीन ऊर्जा देखील भरेल. तसेच आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण अवश्य ऐकावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT