Ajit Pawar's plane crash case | आ. रोहित पवार घेणार खासगी गुप्तहेरांची मदत  
राष्ट्रीय

Ajit Pawar's plane crash case | आ. रोहित पवार घेणार खासगी गुप्तहेरांची मदत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातामागील नेमके कारण शोधण्याच्या हेतूने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी ते हवाई क्षेत्रात वैमानिक किंवा इतर पदांवर काम केलेल्या अधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून अपघाताची शक्यता, तांत्रिक बाबी आणि नियमांचे पालन झाले होते का, याचा अभ्यास ते करत आहेत. तथापि, अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येण्यास विलंब होत असल्याने त्यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या अधिकृत चौकशी अहवाल यायला अजून वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकार्‍यांचे मत आहे. 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यामागील कारणांचा अहवाल लवकर मिळावा आणि अपघातामागील सत्य स्पष्ट व्हावे, यासाठी रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील प्रत्येक पैलू तपासला जावा यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. आम्ही या घटनेमागील संपूर्ण सत्य बाहेर येईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवू, असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी उच्चस्तरीय गुप्तहेर संस्थांची मदत घेतल्याचेही सांगितले.

‘ब्लॅक बॉक्स’ची अवस्था वाईट!

मुंबई : 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या अपघातग्रस्त विमानातून मिळालेला ‘ब्लॅक बॉक्स’ अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला असून, त्यातील महत्त्वाची माहिती मिळवणे कठीण झाले आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. या घडामोडीनंतर विरोधी पक्षांनी कटकारस्थानाचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी अधिक तीव्र केली आहे.

‘ब्लॅक बॉक्स’ परदेशात पाठवला जाण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अधिक चौकशीबाबत सरकार एक-दोन दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT