Road accident in anantnag
अनंतनाग जिल्ह्यात दक्षम येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्‍यू झाला.  X
राष्ट्रीय

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ ठार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दक्षम येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये पाच मुलांसह दोन महिलांचा समावेश आहे. सर्व मृत किश्तवाडचे रहिवासी होते, असे वृत्त 'आयएएनएस'ने दिले आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये कार रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. हे कुटुंब किश्तवाडहून सिंथान टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात होते. कार चालक इम्तियाज हे पोलीस होते. त्‍यांच्‍यासोबत कारमध्ये पाच मुले आणि दोन महिलांचा समावेश होता. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये इम्तियाज आणि त्याची पत्नी अफरोजा यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT