पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (दि. ८) लोकसभेत वक्फ विधेयक मांडले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करत या विधेयकाला मुस्लीमविरोधी म्हटले होते. विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधादरम्यान, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे. वक्फ विधेयकासंदर्भात स्थापन होणाऱ्या जेपीसीमध्ये कोण सदस्य असतील यासाठी आता २१ नावे पुढे आली आहेत. ( Waqf (Amendment) Bill, 2024)
वक्फ विधेयकाबाबत लवकरच जेपीसी स्थापन करण्यात येईल, असे लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले होते. आता जेपीसीच्या २१ सदस्यांची नावे समोर आली आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत जेपीसीच्या २१ सदस्यांची नावे जाहीर केली. किरेन रिजिजू म्हणाले की, ३१ सदस्यांच्या संयुक्त संसदीय समितीमध्ये 21 सदस्य लोकसभेचे आणि 10 सदस्य राज्यसभेचे असतील.
किरेन रिजिजू म्हणाले की, जेपीसी पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वक्फ विधेयकावर आपला अहवाल सादर करेल. जेपीसीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असलेल्या लोकसभेच्या 21 सदस्यांची नावेही त्यांनी उघड केली. हे नाव समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार के सुरेश यांनी एनके प्रेमचंद्रन यांचा जेपीसीमध्ये समावेश करण्याची
लोकसभेतील हे सदस्य वक्फ विधेयकावर जेपीसीमध्ये असणारे सदस्य पुढील प्रमाणे : जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, अपराजिता सारंगी, संजय जयस्वाल, दिलीप सैकिया, अभिजीत गंगोपाध्याय, श्रीमती डीके अरोरा, गौरव गोगोई, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, मौलाना मोहिबुल्ला, कल्याण बॅनर्जी, ए. आर. राजा, एलएस देवरायुलु, दिनेश्वर कामत, अरविंत सावंत, सुरेश गोपीनाथ, नरेश म्हस्के, अरुण भारती आणि असदुद्दीन ओवेसी.