Retired IAS officer son girlfriend attacked with brick Kanpur Pudhari Photo
राष्ट्रीय

Crime News: "माझी आई IAS आहे..." लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीचं डोकं विटेने फोडलं, पोलिसांनाही अरेरावी

लग्नास नकार दिल्याच्या रागातून निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाने आपल्या कथित प्रेयसीवर विटेने जीवघेणा हल्ला केल्ला.

मोहन कारंडे

Retired IAS officer son girlfriend attacked with brick Kanpur

कानपूर : लग्नास नकार दिल्याच्या रागातून निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाने आपल्या कथित प्रेयसीवर विटेने जीवघेणा हल्ला केल्ला. महिलेला कारमधून जबरदस्ती बाहेर ओढून तिच्या डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर विटेने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून सध्या या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

देवाशीष निगम (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो स्वरूपनगर येथील रहिवासी असून त्याने पीडित महिलेला फोन करून आयआयटी-कानपूरच्या मुख्य प्रवेशद्वारावर बोलावले होते. महिला आयआयटी-कानपूरमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पीडित महिला आणि तिचा कथित प्रियकर देवाशीष निगम हे बिठूरमधील ब्रह्मवर्त घाटाकडे कारने जात होते. प्रवासादरम्यान दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर देवाशीषने मंधना परिसरातील सर्व्हिस रोडवर कार थांबवली.

हल्ल्याची भीती वाटल्याने महिलेने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कारचे दरवाजे आतून लॉक केले. मात्र, आरोपीने रस्त्याच्या कडेला पडलेली वीट उचलून कारची काच फोडली. त्यानंतर कारचे दार उघडून महिलेला रस्त्यावर ओढले आणि तिच्या डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर विटेने वार करत बेदम मारहाण केली.

महिलेचा आरडाओरडा ऐकून स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपीने पोलिसांनाही अरेरावी करत धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच, "माझी आई निवृत्त आयएएस अधिकारी आहे," असे सांगत दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पश्चिम विभागाचे डीसीपी एस. एम. कासिम आबिदी यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT