रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घोषणा केली. त्यांनी दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता असलेला बहुप्रतिक्षित रिलायन्स जिओचा आयपीओ २०२६ च्या पहिल्या सहामाहीत आणला जाईल, असे जाहीर केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)ची २०२६ च्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात त्यांची सर्वात महत्त्वाची उपकंपनी Jio Platforms सूचीबद्ध करण्याची योजना आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत मोठा खुलासा केला.
Jio चा IPO पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये येऊ शकतो. Jio Platforms चे ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने ५G, फिक्स्ड ब्रॉडबँड आणि AI तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे. Jio च्या सूचीकरणामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक नवीन मोठी संधी उपलब्ध होणार आहे. बाजारातील तज्ञांचा अंदाज आहे की IPO द्वारे कंपनीचे मूल्यांकन १२-१३ लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
अंबानी म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जिओचा महसूल १.२८ लाख कोटी होता. जिओचा आयपीओ २०२६ च्या पहिल्या सहामाहीत आणला जाईल. या आयपीओमुळे जागतिक स्तरावर शेअरहोल्डर्सना मोठा फायदा होईल. जिओने अलीकडेच ५० कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे, जो अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
जिओचा आयपीओ भारतीय शेअर बाजारासाठी एक ऐतिहासिक ऑफर ठरू शकतो. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जिओची यादी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डर्सना मोठे अतिरिक्त मूल्य प्रदान करेल आणि भारतीय बाजारपेठेला एक नवीन जागतिक बेंचमार्क देईल.