Crime News
लुधियाना: पंजाबमधील लुधियाना शहरात एका खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा शेवट रक्तरंजित थरारात झाला. प्रियकराने 'माझ लग्न झालय' अस सांगताच एका प्रेयसी नर्सने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित निषाद नावाच्या तरूणाने रक्ताच्या थारोळ्यात आपला कापलेला प्रायव्हेट पार्ट कपड्यात गुंडाळून स्थानिक रुग्णालयात पोहोचला होता. "वाटेत गुंडांनी माझ्यावर हल्ला केला," अस त्याने डॉक्टरांना सांगितले. मात्र, त्याच वेळी जालंधर बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेखा नावाच्या नर्सचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या दोन्ही घटनांचा तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
अमित आणि रेखा यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी ते दोघे एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना अमितने "माझा साखरपुडा झाला आहे," असे रेखाला सांगितले. हे ऐकताच रेखाचा राग अनावर झाला आणि तिने धारदार ब्लेडने अमितचा प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर अमितने रागाच्या भरात रेखाचा गळा आवळून खून केला.
हत्येनंतर अमितने रेखाचा मृतदेह हॉटेलच्या खोलीतच सोडला आणि स्वतःची जखम कपड्याने बांधून रिक्षाने रुग्णालय पोहचला. तिथे त्याने गुंडांनी हल्ला केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मृत रेखाला दोन मुले आहेत, ज्यांना पोलिसांनी तिच्या भावाकडे दिली आहेत. रेखाचा भाऊ कोहाडा परिसरात एका कारखान्यात काम करतो. अमित निषाद एम्ब्रॉयडरीचे काम करायचा, तर रेखा एका रुग्णालयात नर्स होती. ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि त्यांच्यात कायदेशीर वादही सुरू होता. अमित आणि रेखा गेल्या अडीच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सध्या अमितवर चंदीगड पीजीआयमध्ये उपचार सुरू असून, तो बरा झाल्यानंतर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.