लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात एनआयएला धक्कादायक नवी माहिती हातास लागली आहे. तपासात असे स्पष्ट होत आहे की संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल हे फक्त कट्टरवाद्यांचे जाळे नव्हते, तर एक उच्च-शिक्षित वैज्ञानिक मंडळी एकत्र येऊन बनवलेले ‘हाय-इंटेलिजन्स टेरर नेटवर्क’ होते. यातील धागे थेट फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेपर्यंत येऊन पोहोचले आहेत.
एनआयएने विद्यापीठातील काचेच्या भांड्यांची नोंद, उपभोग्य साठा आणि रासायनिक पदार्थांच्या वापराच्या नोंदी तपासल्या असता अनेक गोष्टी जुळत नसल्याचे उघड झाले आहे. काही आवश्यक काचेची भांडी, कंटेनर्स आणि रसायने नोंदीत असूनही प्रत्यक्षात प्रयोगशाळेत नसल्याचे आढळले. ही वस्तू लहान-लहान प्रमाणात “शैक्षणिक प्रयोगांसाठी” वापरल्याचा बहाणा करून बाहेर काढली गेल्याचा संशय अधिक बळावला आहे.
एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुझम्मिलने काही महत्त्वाच्या काचेच्या वस्तूंच्या नोंदी लपवल्या किंवा त्यांचा मागोवा ठेवला नाही. प्रयोगशाळेतून गायब झालेली काचेची भांडी व लहान कंटेनर्स हे अचूक मिश्रण, स्फोटकांचे ब्लास्ट-टेस्टिंगसाठी वापरले गेले असावेत, असा तपास पथकाचा अंदाज आहे. सध्या डॉ. मुझम्मिल, डॉ. शाहीन आणि डॉ. आदिल यांची समोरासमोर चौकशी सुरू आहे. नेमकं कोण प्रयोगशाळेतून रसायने बाहेर नेत होतं? मिश्रणाची वैज्ञानिक प्रक्रिया कोणी डिझाइन केली? या सर्व प्रश्नांमुळे तपास आणखी गंभीर होत आहे.
पीठ गिरणीत दळलेला युरिया
तपासादरम्यान एनआयएने धौज गावात राहणाऱ्या एका टॅक्सी चालकाच्या घरातून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या
पीठ दळण्यासाठीची गिरणी
इलेक्ट्रॉनिक उपकरणे
धातू वितळवण्याचे यंत्र
या सर्वांवरून तपास पथक थक्क झाले, कारण डॉ. मुझम्मिल या गिरणीत युरिया दळत होता, त्यानंतर मशीनच्या साहाय्याने त्याचे शुद्धीकरण केले जात होते. पुढे हेच साहित्य स्फोटक मिश्रणात वापरले गेले. ९ नोव्हेंबर रोजी मुझम्मिल ज्या खोलीत मिश्रण करत होता, तिथून
३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटके जप्त करण्यात आली.
याशिवाय त्याने फतेहपुर तगा येथे वेगळी खोली भाड्याने घेतली होती. त्या खोलीतून २,५५८ किलो संशयास्पद स्फोटक साहित्य जप्त झाल्याने NIA ला घातक स्फोटकाचा मोठा भाग सापडल्याचे मानले जात आहे.
मुझम्मिल आणि चालकाची ओळख एक विचित्र सुरुवात
टॅक्सी चालकाने सांगितले की चार वर्षांपूर्वी त्याच्या मुलावर गरम दूध सांडले होते. उपचारासाठी त्याला अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथेच त्याची ओळख डॉ. मुझम्मिलशी झाली. हळूहळू दोघांचे बोलणे वाढले आणि मुझम्मिलने गिरणी त्याच्या घरात ठेवली. “ही माझ्या बहिणीचा हुंडा आहे” अशी कहाणी सांगून त्याने संशय दूर ठेवला.
अजून दोन डॉक्टरांच्या चौकशीने तपासाची दिशा बदलली
एनआयए व दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अल-फलाहचे
डॉ. जुनैद युसूफ
डॉ. नासिर रशीद
यांचीही चौकशी सुरू केली आहे. हे दोघे दहशतवादी मॉड्यूलशी संपर्कात असल्याचा संशय वाढत असून त्यांची भूमिका तपासली जातेय. पूरेपूर तपासातून असे चित्र स्पष्ट होत आहे की हे मॉड्यूल फक्त दहशतवादी नव्हते तर वैज्ञानिक कौशल्यांचा गैरवापर करून उच्च दर्जाची स्फोटके तयार करणारे अत्यंत प्रशिक्षित नेटवर्क होते