File Photo. 
राष्ट्रीय

पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती, चीनकडून होणार्‍या अपप्रचाराची झाली 'पोलखोल'

पर्यटकांचा राज्‍यात 'रेकॉर्डब्रेक' ओघ, देशातंर्गत-आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गोवा हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. देशातंर्गत असो की, आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांसाठी गोवा हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असल्‍याचे स्‍पष्‍ट होत असतानाच चीनकडून निराधार आणि चुकीची माहिती प्रसारीत केली जात आहे. (Record Tourist Influx in Goa) गोव्यात पर्यटक येत नसल्याच्‍या निराधार माहिती चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरकडून पसरवली जात आहे. मात्र वास्‍तवात राज्‍याच्‍या महसुलात झालेली वाढ ही गोव्‍यात पर्यटकांचा रेकॉर्डब्रेक ओघ कायम असल्‍याचे सांगते.

चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरकडून चुकीची माहितीचा प्रचार

मागील काही आठवड्यात गोव्याच्या पर्यटन उद्योगाविषयी चुकीची माहिती सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून पसरवली जात आहे. गोव्‍याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. गोव्यातील समुद्रकिनारे आणि रस्ते रिकामे असल्‍याचा दावा चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरने संशयास्पद सर्वेक्षणाने प्रसारीत केली आहे. चीनमधील सोशल मीडिया 'इन्फ्लुएन्सर्स'कडून याचा प्रचार केला आहे. तसेच विमानसेवा आणि हॉटेलचे खर्चामुळे पर्यटकांना परावृत्त केल्याबद्दल तक्रार केली जात असल्‍याची चुकीची माहिती दिली जात आहे. सणासुदीच्या काळात गोव्‍यात पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचा दावा करण्‍यात येत आहेत. वास्तव खूप वेगळे आणि आशावादी चित्र रंगवते. गोवा हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागतांसाठी सर्वाधिक मागणी असलेले एक ठिकाण ठरले आहे. गोव्‍यात पर्यटकांची होणारी गर्दी ही रेकॉर्डब्रेक ठरत आहे.

गोव्‍यात विक्रमी पर्यटकांचा ओघ

गोव्यात पर्यटकांच्या संख्‍येत लक्षणीय वाढ झाली आहे, हॉटेल्स हाउसफूल्‍ल आहेत. तसेच समुद्रकिनारेही गजबजलेले आहेत. गाेव्‍यातील नाइटलाइफ, सांस्कृतिक उत्सव आणि मूळ समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. हनजून आणि कळंगुटसारख्‍या समुद्रकिनार्‍यांची लोकप्रियता कायम आहे.

गोव्‍यातील महसुलात लक्षणीय वाढ,  चीनच्‍या दाव्‍याची 'पोलखोल'

गोव्‍यातील पर्यटन उद्योगाच्‍या भरभराटीमुळे राज्‍यातील महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 या एका महिन्‍यात राज्‍यातील महुसलात मागील वर्षीच्‍या तुलनेत 75.51 कोटी रुपये वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण महसूलात 4614.77 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 365.43 कोटी रुपये आहे. राज्‍यातील जीएसटी महसुलात ९.६२ टक्‍के तर VAT संकलनात 6.41 टक्‍के वाढ झाली आहे. ही आकडेवारीच चीनच्‍या सोशल मीडियावर होत असलेल्‍या अपप्रचाराची पाेलखाेल करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT