दुर्मिळ योगायोग ! 'हे' ६ मोठे ग्रह अवकाशात दिसणार एकाच रेषेत Pudhari
राष्ट्रीय

दुर्मिळ योगायोग! 'हे' ६ मोठे ग्रह आज अवकाशात दिसणार एकाच रेषेत

Planetary Parade 2025 | आज पाहता येणार ही खगोलीय घटना

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाशात अनेक खगोलीय घटना घडत असतात. काही घटना या आपल्याला उपकरणांचा आधार घेऊन पाहता येतात तर काही खुल्या अवकाशात पृथ्वीवरूनच त्या अनुभवता येतात. अशीच दुर्मिळ खगोलीय घटना आज (दि.२५) अनुभावता येणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे.

अवकाशातील 'हे' ग्रह पृथ्वीवरून दिसणार

आज शनिवारी (दि.२५) रात्रीच्या वेळी आकाशात शुक्र, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून आणि युरेनस हे सहा ग्रह एकाच देशात येणार आहेत. ही घटना "ग्रहीय परेड" म्हणून ओळखली जाईल. अशा खगोलीय घटना २१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान अनुभवता येणार आहे. आज (दि.२५) रात्री सर्व सहा ग्रह पृथ्वीच्या वर एका विस्तृत कमानीमध्ये सूर्याच्या एकाच बाजूला एकत्र येतील आणि त्यापैकी बहुतेक रात्रीच्या स्वच्छ आकाशात उघड्या डोळ्यांना दिसणार असल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

दुर्बिणीद्वारे युरेनस आणि नेपच्यून पाहता येणार

हवामान विभागाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ग्रहमंडळाच्या रचनेनुसार आणि ग्रहांच्या वेगवेगळ्या क्रांतीच्या काळानुसार, आकाशाच्या एकाच चौकटीत सर्व ग्रह असणे दुर्मिळ आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ मध्ये आपण पूर्व आकाशात गुरु आणि मंगळ ग्रह, उघड्या डोळ्यांनी पश्चिम आकाशात शनि आणि शुक्र आणि दुर्बिणीद्वारे युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह पाहू शकतो. ग्रहमंडळाच्या रचनेनुसार आणि ग्रहांच्या वेगवेगळ्या क्रांतीच्या काळानुसार, आकाशाच्या एकाच चौकटीत सर्व ग्रह असणे दुर्मिळ आहे.

सर्वाधिक ग्रह एकाच रेषेत, दुर्मिळ घटना

नासाच्या मते, अशा घटना, विशेषतः चार किंवा अधिक ग्रहांशी संबंधित घटना, उल्लेखनीय आहेत. दरवर्षी अशा घटना घडतीलच असे सांगता येत नाही. शिवाय ही घटना असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे मंगळ, गुरू, शनि आणि शुक्र यासह दृश्यमान तेजस्वी ग्रहांची संख्या जी दरवर्षी घडत नाही, असेही नासाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT