सुनेत्रा पवार यांनी कंगना रनौत यांची भेट घेतली  (Source- Facebook)
राष्ट्रीय

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समितीच्या बैठकीत उपस्थित, चर्चांना उधाण

सुनेत्रा पवार यांनी कंगना रनौत यांची भेट घेतली

पुढारी वृत्तसेवा

Sunetra Pawar meets Kangana Ranaut

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार ह्या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका स्नेहमेळाव्यात उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी स्वतः याची माहिती फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे. ''राज्यसभेतील आमचे सहकारी गोविंदभाई ढोलकियाजी यांच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात त्यांच्या कुटुंबियांसह तसेच राज्यसभेतील काही मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत सहभागी झाले.'' असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी, लोकसभा खासदार कंगना रनौत यांच्या घरी स्नेहपूर्वक कौटुंबिक भेट झाल्याचे म्हटले आहे. या प्रसंगी परस्परांमध्ये स्नेहपूर्ण संवाद साधले गेले आणि आपुलकीचे क्षण अनुभवता आले, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांनी कंगना रनौत यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

कोण आहेत गोविंदभाई ढोलकिया?

गोविंदभाई ढोलकिया हे गुजरातमधील भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. ते प्रसिद्ध हिरे व्यापारी आहेत. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराला ११ कोटी रुपयांची देणगी दिली होती. ते आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांचा १९९२ मधील राम जन्मभूमी आंदोलनात सहभाग होता. दरवर्षी दिवाळी दरम्यान, गोविंदभाई ढोलकिया चर्चेत असतात. कारण ते दरवर्षी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मौल्यवान भेटवस्तू देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT