राजकोटमधील इमारतीला भीषण आग Pudhari Reprentative Photo
राष्ट्रीय

राजकोटमधील इमारतीला भीषण आग; होरपळून तिघांचा मृत्यू, ३० जण अडकले

घटनास्थळी बचावकार्य सुरु

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधून (Rajkot Building Fire) एक मोठी बातमी समोर आली आहे. राजकोटमधील अटलांटिस इमारतीत भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या इमारतीत अजूनही ३० लोक अडकल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अशा घटनेचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे ५० लोकांना वाचवण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेच्या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उभ्या असल्याचे दिसून आले आहे, तर संकुलाजवळ गर्दी जमलेली दिसत आहे.

इमारतीत आग कशामुळे लागली?

आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. या इमारतींमध्ये बहुतेक आगी कशा आणि का लागल्या? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येत आहे. आता तपास सुरू आहे आणि खरी कारणे शोधली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT