Rajasthan Viral News : राजस्थानमधून एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर बसून पैशाच्या नोटा जाळत असल्याचे दिसत आहे. त्याच्या बाजूला पैशाचे बंडलेही दिसत आहेत. ही घटना जयपूर येथील आहे या बाबत अधिक माहिती अशी की मंजित धाकड व त्याची पत्नी २२ हजाराचा ड्रेस (सूट) घेण्यावरुन या दोघांमध्ये भांडण झाले होते. पतीचे म्हणने होते की पहिल्यांदा घर घेऊ नंतर इतर खर्च करु यावरुन दोघात भांडण झाले, रागातून पत्नी माहेरला निघून गेली.
ना राहतील पैसे ना होतील भांडणे
जयपूर येथील रहिवासी मनजीत धाकड चे म्हणने होते आधी स्वतःचे घर खरेदी करू आणि त्यानंतर इतर हौस-मौज पूर्ण करू, असे पतीचे म्हणणे होते. त्यानंतर दोघांचा चांगलाच वाद झाला. या वादानंतर पती कामावर निघून गेल्यावर पत्नीने आपले सर्व सामान आवरले आणि ती माहेरी निघून गेली. घरी आल्यावर त्याला हे लक्षात आले पत्नीच्या या पावलामुळे संतापलेल्या पतीने कथितरित्या बँकेतून आपली वर्षभराची कमाई (जमापुंजी) काढली आणि रस्त्याच्या कडेला बसून नोटांना आग लावली. ना पैसे राहतीन ना भांडणे होतील असे त्याचे मत असल्याचे समजते.
घरासाठी ठेवले होते पैसे साठवून
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांमधून कळते की त्याने हे पैसे घरासाठी ठेवले होते. ते तो जाळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जाळलेल्या नोटा खऱ्या होत्या की नकली, याची अधिकृत पोलीस किंवा प्रशासकीय पुष्टी मात्र झालेली नाही. पण या घटनेचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होत आहे.