नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजा इक्बाल सिंह १३३ मते घेत विजयी झाले. ते या अगोदर विरोधी पक्षनेते होते. काँग्रेस उमेदवार मनदीप सिंग यांना फक्त ८ मते मिळाली. एक मत अवैध घोषित करण्यात आले. 'आप'ने आधीच निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
बेगमपूर प्रभागातील भाजपचे नगरसेवक जय भगवान यादव यांची उपमहापौरपदी निवड झाली. उपमहापौर पदासाठी काँग्रेसने अबुल फजल अरिबा खान यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत भाजपचा विजय आधीच निश्चित होता, कारण भाजपकडे ११७ आणि काँग्रेसकडे फक्त ८ नगरसेवक होते. एमसीडीच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत २५० नगरसेवकांव्यतिरिक्त, दिल्लीचे १० खासदार (लोकसभेचे सात आणि राज्यसभेचे तीन) आणि १४ आमदार देखील मतदान करतात.