पुढील ५ दिवस पावसाचे, पश्चिम किनारपट्टीला झोडपणार File Photo
राष्ट्रीय

पुढील ५ दिवस पावसाचे, पश्चिम किनारपट्टीला झोडपणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पुढील ५ दिवस पाऊस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार आहे. आजपासून (दि.२४ जून) शुक्रवार २८ जूनपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

सोमवार २४ जून ते शुक्रवार २८ जूनपर्यंत राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, गोवा, आणि अरुणाचल प्रदेशातील घाट भागात पुढील ५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज २४ जून रोजी गुजरात राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.

सोमवार २४ आणि मंगळवार २५ जूनला अंदमान आणि निकोबार बेट, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. तर २४ जून ते २६ दरम्यान दक्षिण किनारपट्टी अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे याठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather Forecast : गुजरातमध्ये कमी ते मध्यम पुराची शक्यता

पुढील २४ तासांत गुजरातमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून, बहुतांशी भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. सौराष्ट्राचा दक्षिण भाग, कच्छचा मध्य भाग, गुजरात राज्याच्या दक्षिणेकडील भागांत अतिवृष्टीमुळे कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी सक्रीय होणार

उत्तर अरबी समुद्र आणि गुजरात राज्याच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 3-4 दिवसांत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा काही भाग, मध्य प्रदेशातील आणखी काही भाग, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा उर्वरित भागात मान्सून पोहचेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT