नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून रेल्वे प्रवास महागणार आहे. रेल्वेने १ जुलैपासून भाडेवाड करण्याची घोषणा केली आहे. ही वाढीमुळे मोठ्या प्रवासाठीच्या भाड्यात किरकोळ वाढ होणार आहे. त्याचबरोबर तिकीट बुकिंगच्या नियमातसुद्धा बदल होणार आहे. कोव्हिड महामारीनंतर पहिल्यांदाज रेल्वेकडून भाडेवाड केली जाणार आहे. एक्सप्रेस बरोबर लोकल गाड्याच्या भाड्यातही वाढ होण्याचे संकेत रेल्वेतर्फे देण्यात आले आहे. ही वाढ मुख्यतः ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे करण्यात आली आहे.
एक्सप्रेसच्या दरात नॉन एसी प्रतिकिलोमिटर १ पैसे, तर एसी कोचमध्ये २ पैसे प्रतिकिलोमिटर वाढ होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार१ जुलै पासून ही दरवाढ अमंलात होणार आहे.
रेल्वेच्या अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की, लोकल ट्रेन (उपनगरीय तिकिटे) आणि ५०० किलोमीटरपर्यंतच्या सामान्य किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवासाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. परंतु, जर तुम्ही ५०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर भाडे प्रति किलोमीटर अर्धा पैसे दरवाढ लागू होईल. याशिवाय, मासिक व हंगामी तिकिटांच्या किमतींही वाढणार नाहीत.
रेल्वे मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की १५ जुलै २०२५ पासून, तत्काळ तिकिटे बुक करताना, प्रवाशांना आधार कार्डवरून ओटीपी (वन टाईम पासवर्ड) द्वारे देखील तिकीटाची पडताळणी करावी लागेल. रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी काही नियमांमध्येही बदल केले आहेत. आता आयआरसीटीसी एजंट पहिल्या अर्ध्या तासासाठी तत्काळ तिकिटे बुक करू शकणार नाहीत. हा नियम एसी क्लासेससाठी सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत आणि नॉन-एसी क्लासेससाठी सकाळी ११:०० ते ११:३० पर्यंत लागू असेल. म्हणजेच, या वेळेत तिकीट एजंट तत्काळ तिकिटे बुक करू शकणार नाहीत.
मेल/एक्सप्रेस (Non-AC): प्रतिकिलोमीटर १ पैसे वाढ
AC डबे (AC 2 Tier, AC 3 Tier, AC Chair Car): प्रतिकिलोमीटर २ पैसे वाढ
द्वितीय श्रेणी (सामान्य)
५०० किमीपर्यंत – कोणतीही भाडेवाढ नाही
५०० किमीहून अधिक अंतर – ०.५० पैसे प्रतिकिलोमीटर वाढ
हे दर राहणार जुनेच -
लोकल/उपनगरी गाड्या – कोणतीही भाडेवाढ नाही
मासिक पास (MST) – जुने दर कायम