Raihan Vadra Photo Controversy: काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राने बीकानेर हाऊसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रदर्शानातून रेहान यांच्या कलाकृतींचा मोठा भाग व्यवस्थापनाने हटवण्यास सांगितलं. या कलाकृतीत अर्थात फोटो प्रदर्शनात दिल्लीत झालेल्या तरूणांच्या आंदोलनाबाबतचे देखील फोटो होते. त्यामुळं हे फोटो वादग्रस्त होते. रेहान यांनी दावा केला आहे की तिरंगा असलेले दोन फोटो देखील व्यवस्थापनाने हटवण्यास सांगितले होते. मात्र याला मी नकार दिला आहे.
रेहान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिले की, 'पाच तासापूर्वी बीकानेर हाऊस मॅनेजमेंटने मला माझ्या 'नो आयडिया इज फायनल' या शोमध्ये प्रदर्शनात ठेवलेल्या कलाकृतींचा मोठा भाग हटवण्यास भाग पाडलं. या फोटोंच्या प्रदर्शनात दिल्लीतील तरूणांच्या विरोध प्रदर्शनाचे फोटो होते. कंटेट हा आक्षेपार्ह होता. त्यांनी मला दोन तिरंगा असलेले फोटो हटवण्यास सांगितलं. मात्र मी त्याला विरोध केला अन् नकार दिला. मी भारतीय ध्वज असलेला फोटो हटवणार नाही असं ठणकावून सांगितलं.'
रेहानने हा शो सध्या अंशतः सुरू राहणार आणि जर गरज वाटलीच तर दुसऱ्या ठिकाणी संपूर्ण विरोध प्रदर्शनाच्या फोटोंचे पूर्ण कलेक्शन प्रदर्शित केलं जाणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि एआईसीसी माध्यम प्रचार विभाग प्रमुख पवन खेरा यांनी रेहान वाड्रा यांची पाठराखण करत एखाद्या कलाकृतीवर सेन्सॉरशिप लावण्याच्या मागे काय गुन्हा होता.
पवन खेरा म्हणाले, 'जर सेन्सॉरच्या कात्रीतून तिरंगा देखील सुटू शतक नाही त्यावेळी दोष कलाकृतीत नसते तर तो दोष सत्तेत असतो. रेहान यांचा आर्ट शो नो आयडिया इज फायनल सुरू झाल्यानंतर काही तासातच बीकानेर हाऊसने त्यांच्या ७४ कलाकृती हटावल्या. या एकूण कलाकृतींच्या निम्म्या होत्या. या फोटोंमध्ये फक्त विरोध प्रदर्शन दाखवण्यात आला होता. त्यात कोणतेही आक्षेपार्ह आणि भानवा भडकवणारे असे काही नव्हते. मग त्यात चूक काय होतं?
पवन खेरा यांना दावा केला की, ज्या फोटोंना हटवण्यापासून वाचवण्यात आलं त्यात तिंरग्याचे देखील फोटो होते. केंद्र सरकारला फक्त विचारांशी नाही तर विरोध प्रदर्शनांची देखील भीती वाटते. आता प्रदर्शनातील फोटोमधील राष्ट्रीय ध्वज देखील त्यांना अडचणीचा विषय ठरत आहे.