Rahul Vijay Reels Controversy pudhari
राष्ट्रीय

Rahul Vijay Reels Controversy: विजय - राहुल यांचे रील सरकारनं ब्लॉक केले; मंत्रालयानं मान्यही केलं.. मात्र कहानी मैं हैं ट्विस्ट

Anirudha Sankpal

Rahul Gandhi Vijay Reels Controversy: काँग्रेसने केंद्र सरकावर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि तमिळ नाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे रील्स आणि फोटो ब्लॉक केल्याचा आरोप केला. हे आरोप केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी आज फेटाळून लावले. काँग्रेसने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने राहुल गांधी आणि विजय यांचे रील आणि फोटो ब्लॉक करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता असा आरोप केला.

काय स्पष्टीकरण दिलं?

दरम्यान, मंत्रालयातील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचा राहुल गांधी आणि विजय यांचे रील्स आणि फोटो ब्लॉक करण्याशी कोणताही संबंध नाही. त्या प्लॅटफॉर्ममधील अंतर्गत व्यवस्थेनं चुकून पोस्ट ब्लॉकिंग करत असल्याचा फ्लॅग दिला.

सूत्रांनी सांगितलं की, 'इलेक्ट्रॉनिक आणि इन्फ्रॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा बाबतच्या पोस्ट करणारे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केल्याचा दावा चुकीचा आहे. याच्याशी मंत्रालयाचा काही संबंध नाही. हे प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत व्यवस्थेमुळं या पोस्ट चुकून ब्लॉक म्हणून फ्लॅग झाल्या आहेत. आता त्या प्लॅटफॉर्मकडून रिस्टोर करण्यात आल्या आहेत.'

तुफान व्हायरल झाला होता रील

युथ काँग्रेसचे माजी प्रमुख श्रीवास्तव यांनी दावा केला होता की या रील्सना एका तासात १२ मिलियन व्ह्यूज आल्या होत्या. तर व्हायरल फोटो हा ४६ मिलिनयवर पोहचला होता.

श्रीवास्तव यांनी सांगितलं की, 'इन्स्टाग्रामने राहुल गांधी यांचे थलपती विजय यांच्यासोबतचे फोटो आणि रील्स हे ब्लॉक केले. हे फोटो आणि रील्स विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळेचे होते. हा रील्स एका तासाच्या आतच १२ मिलिनिय व्ह्यूजपर्यंत पोहचला होता. तर फोटो ४६ मिलियन लोकांपर्यंत पोहचला होता.

श्रीवास्तव पुढे म्हणाले, 'मेटाने त्यांचे अकाऊंट का अॅक्सेसेबल झालं नाही याबाबत कोणतेही कारण दिलेलं नाही. हा ग्लिच मंत्रालयाच्या नियामामुळं आहे. अनेक दिवसांपासून राहुल गांधी यांचे सोशल मीडिया अकाऊंट दाबलं जात आहे. त्यांचे एक्स वरील रीच, युट्यूबवरील व्ह्यूज आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स हे सप्रेस केले जातात. अशा प्रकारे भारताच्या विरोधीपक्ष नेत्याच्या आवाज भारतात दाबला जातो.'

विजय यांनी रविवारी तमिळ नाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर विजयने राहुल गांधी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

काँग्रेसने आपल्या पाच आमदारांचा पाठिंबा विजय यांच्या टीव्हीके पक्षाला दिला आहे. टीव्हीके हा तमिळ नाडूमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. यानंतर सत्ता स्थापनेबाबत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. राज्यपालांनी विजय यांना बहूमताचा आकडा ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणण्यास सांगितलं होतं. हे बहूमत राज्यपालांच्या दरबारात सिद्ध करण्यासाठी विजय यांना तीन ते चारवेळा राजभवनाच्या हेलपाटे घालावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT