'तुमची शिकवण हीच माझी प्रेरणा'; राहुल यांची राजीव गांधींना आदरांजली File Photo
राष्ट्रीय

Rahul Gandhi | 'तुमची शिकवण हीच माझी प्रेरणा'; राहुल यांची राजीव गांधींना आदरांजली

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (दि.२० ऑगस्ट) जयंती. या निमित्त लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी एक्स पोस्टवरून वडीलांविषयींच्या भावना व्यक्त केल्या आहे.

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "एक दयाळू व्यक्तिमत्व, सुसंवाद आणि सद्भावनेचे प्रतीक…बाबा. तुमची शिकवण हीच माझी प्रेरणा आहे. आणि तुमच्या आठवणी माझ्यासोबत घेऊन मी भारतासाठी तुमची स्वप्ने पूर्ण करेन"

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी देखील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वीर भूमी येथे पुष्पांजली वाहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT