EVM Machine File Photo
राष्ट्रीय

राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, बॅलेट पेपर परत आल्यावरच निवडणूक लढवावी

EVM Machine Controversy | काँग्रेसच्या ईव्हीएमविरोधी भूमिकेवर भाजपचा पलटवार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपने जोरदार प्रहार केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपर परत आल्यानंतरच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करावे.

त्यांनी असे केले तर कदाचित त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अन्यथा हे आरोप केवळ पोकळ शब्दच राहतील. ईव्हीएम आधारित निवडणूक प्रक्रियेतून निवडून येऊन ते खासदारही झाले आहेत, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेसने न्यायालयात जावे, असे भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेची पुष्टी केली असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, प्रियंका गांधी यांनी लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. ही मोठी विडंबना आहे, काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT