Rahul Gandhi Aggressive Statement
नवी दिल्ली : निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंगळवारी 'पिक्चर अभी बाकी है' म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला इशारा दिला आणि आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत मात्र निवडणूक आयोग 'एक व्यक्ती, एक मत' हे कर्तव्य बजावत नाही, असे म्हणत आयोगावर टीकाही केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपशी संगनमत करून निवडणूक आयोगाने मतदार यादीत छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात हे षड्यंत्र घडले होते आणि आता 'एसआयआर'द्वारे बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू आहे.
ही फक्त एक-दोन जागांची गोष्ट नाही तर हे अनेक जागांवर घडले आहे. या गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणि नियोजनानुसार केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाला याची जाणीव आहे. पूर्वी आमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते, आता पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.