राहुल गांधी file photo
राष्ट्रीय

पॅरीससारखी चमकती दिल्ली बघा,अस्वच्छतेवरुन राहुल गांधींचा केजरीवालांना खोचक टोला

Rahul Gandhi : भेटीवेळीचा व्हिडीओ राहुल गांधींनी ‘एक्स’वर केला पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी वायव्य दिल्लीतील रिठाळा भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील अस्वच्छतेवरुन अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला खोचक टोले लगावले आहेत. या भेटीवेळीचा व्हिडीओ राहुल गांधी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, बघा, ही चमकती दिल्ली आहे. रिठाळा येथील एका तुंबलेल्या नाल्याजवळून जाताना त्यांनी हा व्हिडीओ केला आहे. तुंबलेले सांडपाणी आणि घाणीच्या साम्राज्याकडे पाहून गांधी यांनी ही टिप्पणी केली आहे. पॅरीससारखी दिल्ली आहे, सगळीकडे हेच हाल आहेत, असे ते व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. ही केजरीवालांची 'चमकणारी' दिल्ली आहे - पॅरिस वाली दिल्ली आहे, असे शीर्षक राहुल गांधी व्हिडीओला दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT