पुढारी ऑनलाईन :
अंबानी कुटुंबीय हे त्यांच्या उद्योग आणि श्रीमंतीसाठी देशात प्रसिद्ध आहेत. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या फॅशनच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जातो. यात या कुटुंबाची छोटी सूनबाई मात्र थोडी हटके आहे असे म्हणावे लागेल. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडला. यानंतर अनेक कार्यक्रमात आपल्या एकापेक्षा एक स्टाईलिश लुक्समुळे राधिका ही चर्चेत असायची. त्यातच त्यांची ट्रॅडिशनलच नाही तर वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र घालण्याची पद्धत अनेकांना भावली. (radhika merchant)
जेंव्हापासून राधिका मिसेस अनंत अंबानी बनली आहे, तेंव्हापासून त्यांच्या गळ्यात नेहमीच मंगळसूत्र दिसून आले आहे. मात्र यावेळी त्या NMACC च्या आर्ट कॅफेच्या लॉन्च दरम्यान डीप नेक ड्रेसमध्ये मंगळसुत्रा शिवाय दिसून आल्या. पण जेंव्हा त्यांच्या हाताकडे लक्ष गेले तेंव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या. त्यांनी मंगळसुत्र ब्रेसलेट म्हणून हाताला गुंडाळले हाेते. त्यांची ही बटरफ्लाय मंगळसूत्र घालण्याची पद्धत अनेकांना आवडली.
राधिका आर्ट कॅफेच्या ओपनिंगसाठी सासू नीता अंबानी, ननंद ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्यासोबत दिसून आल्या. या ठिकाणी राधिका अंबानी या Dior चा ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड ड्रेसवर रिया कपूरने डिझाईन केले होते. ज्यामध्ये डीप नेकलाईनचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये राधिका अंबानी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर त्यांच्या बटरफ्लाय मंगळसूत्राची चर्चा झाली.