हैदराबाद पोलिसांनी 'पुष्पाराज' ला पाठवले समन्स, चेंगराचेंगरी प्रकरणी होणार चौकशी File Photo
राष्ट्रीय

हैदराबाद पोलिसांनी 'पुष्पाराज' ला पाठवले समन्स, चेंगराचेंगरी प्रकरणी होणार चौकशी

Pushpa 2 : आज (मंगळवार) अल्‍लू अर्जुनची हाेणार चौकशी

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन

'पुष्‍पा २' फेम अभिनेता अल्‍लू अर्जुनच्या अडचणी काही कमी होत नसल्‍याचे दिसून येत आहे. पुष्‍पा २ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्‍यान संध्या थिएटरमध्ये झालेल्‍या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून सुपरस्‍टार अल्‍लु अर्जुन विवादात सापडला आहे. आता अल्‍लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थेटर चेंगराचेंगरी प्रकरणी आज (मंगळवार) चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. (Pushpa 2)

पुष्‍पा २ च्या प्रीमियरच्या दरम्‍यान झालेल्‍या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला होता. तर तीचा मुलगाही गंभीर जखमी झाला होता. या ८ वर्षीय मुलाला डॉक्‍टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आज मंगळवारी चौकशीसाठी अल्‍लु अर्जुनला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली आहे.

दाक्षिणात्‍य अभिनेता अल्‍लू अर्जुनच्‍या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्‍यात घेतले आहे. दरम्‍यान, तोडफोडीच्‍या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता. या प्रकरणी अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांकडून आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा असल्‍याचे जुबली हिल्स पोलीसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

'त्‍या' महिलेच्‍या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्‍याची मागणी

उस्मानिया विद्यापीठातील पदाधिकार्‍यांनी अल्‍लू अर्जुन नेत्यांनी अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्‍यांनी संध्या थिएटरमध्‍ये झालेल्‍या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी तत्‍काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) आठ सदस्यांना अटक केली. त्‍यांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. दरम्‍यान अल्‍लू अर्जुनच्‍या घरात तोडफोडीचा व्‍हिडिओ सोशल मीडिया व्‍यहायल झाला आहे. यामध्‍ये काही जण घराच्‍या कंपाऊंडमधील कुंड्या फोडल्‍याचे दिसत आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सहा जण ताब्‍यात

या प्रकरणी जुबली हिल्स पोलिसांनी सांगितले की, दाक्षिणात्‍य अभिनेता अल्‍लू अर्जुनच्‍या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. फलक घेऊन निषेध केला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांकडून आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात त्याच्यावर झालेल्या नवीन आरोपांदरम्यान अल्लू अर्जुनने रविवारी एक निवेदन जारी केल्यानंतर काही तासांनी त्याने आपल्या चाहत्यांना कोणत्याही अपमानास्पद भाषा किंवा वर्तनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

काय घडलं हाेतं?

4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्‍ये झालेल्‍या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, थिएटर आणि सुरक्षा एजन्सीविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्‍लू अर्जुनला झाली हाेती अटक

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अटक केली होती. अटकेनंतर त्याला 4 वाजता स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्लूने अंतरिम जामिनासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केले होते.सायंकाळी ५ वाजता त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, अल्लूला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. यानंतर 14 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता अल्लूची चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती.

'पुष्‍षा-2' ने केला भारतात १ हजार कोटींचा टप्पा पार

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर चित्रपट पुष्पा: द रुल - भाग २ (Pushpa 2 The Rule) रोज बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवत आहे. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत प्रभास स्टार कल्की 2898 एडी या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात सुमारे ९२ कोटी रुपयांची कमाई केली होती. Sacnilk च्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 - द रुल आता एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर बाहुबली २ सोबत १ हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT