Puri Rath Yatra stampede  Pudhari
राष्ट्रीय

Puri Rath Yatra stampede : पुरी रथयात्रेत प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्‍थिती; एकाचा मृत्यू, अनेक भाविक रुग्णालयात दाखल

रथ ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकाची उसळलेली गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Puri Rath Yatra stampede : पुरी रथयात्रेत उसळलेल्या भाविकांच्या अथांग गर्दीत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात एका भाविकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या दुर्घटनेतील मृत्यू बद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमींना वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लाखो भाविकांची गर्दी

चेंगराचेंगरीची परिस्थिती 'बडा डांडा' (ग्रँड रोड) येथे निर्माण झाली. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी येथे लाखो भाविक एकत्र आले होते.

बचाव कार्य सुरू

आपत्कालीन बचाव पथकांनी जखमींना तात्काळ गर्दीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य आणि गर्दी नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले. प्रत्‍यशदर्शींनी सांगितले की, मरीची कुंड चौकाजवळ बाहेरील बाजूचे दोरीचे बॅरिकेड कोसळले किंवा काही लोकांचे संतुलन बिघडले आणि ते रस्त्यावर पडले. अनेक भाविक जखमी झाले आणि ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले.

अभूतपूर्व गर्दी आणि सतत सुरू असलेला पाऊस...

दरम्यान, गुरुवारी झालेली अभूतपूर्व गर्दी आणि सतत सुरू असलेला पाऊस यामुळे गुदमरल्यासारखे होणे किंवा इतर किरकोळ दुखापतींच्या तक्रारींनंतर सुमारे २०० रुग्णांना पुरीमधील विविध रुग्णालये आणि तात्पुरत्या आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT