पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स (एफबीआय)च्या मोस्ट वॉन्टेड यादीतील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया शहनाज सिंग उर्फ शॉन भिंदर याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवरुन दिली आहे.
शहनाज सिंग उर्फ शॉन भिंदर हा अमेरिकेतील गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स (एफबीआय)च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. २६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश करण्यात आला होता. यावेळी ३९१ किलो मेथाम्फेटामाइन (आयसीई), १०९ किलो कोकेन आणि चार बंदुका जप्त केल्या होत्या. अटक केलेल्यांमध्ये अमृतपाल सिंग उर्फ अमृत उर्फ बाल, अमृतपाल सिंग उर्फ चीमा, तकदीर सिंग उर्फ रोमी, सरबसित सिंग उर्फ साबी आणि फर्नांडो वल्लादारेस उर्फ फ्रँको यांचा समावेश आहे ड्रग्ज तस्करांच्या चौकशीवेळी शहनाज सिंग उर्फ शॉन भिंदर याचे नाव समोर आले होते.
शहनाज सिंग हा कोलंबियामधून अमेरिका आणि कॅनडामध्ये तो अंमलीपदार्थांची तस्करी करत होता. अमेरिका पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात धडक कारवाई सुरु केल्यानंतर तो भारतात पळून आला होता. पंजाब पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे.