सर्वोच्च न्यायालय File Photo
राष्ट्रीय

पुण्यातील एका रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्याची परवानगी

Supreme Court News | सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाला स्‍थगिती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुण्यातील एका रेस्टॉरंटला 'बर्गर किंग' हे नाव वापरण्यास मनाई करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. यामुळे आता या संदर्भातील उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंट हे नाव वापरू शकणार आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले की, अस्पष्ट आदेशाला स्थगिती राहील. तथापि, मुंबई उच्च न्यायालय अपीलावर सुनावणी सुरू ठेवू शकते. फास्ट-फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने त्याच नावाच्या पुणेस्थित रेस्टॉरंट विरोधात दाखल केलेला ट्रेडमार्क उल्लंघनाचा दावा फेटाळणाऱ्या पुणे न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

बर्गर किंग कॉर्पोरेशन आणि "बर्गर किंग" नाव वापरत असलेल्या पुण्यातील रेस्टॉरंट यांच्यातील हा वाद आहे. यूएस फास्ट-फूड कंपनीने युक्तिवाद केला की, स्थानिक रेस्टॉरंटने हे नाव वापरामुळे त्याच्या ब्रँड प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. यामुळे नाव वापरण्यास बंदी घालण्याची विनंती बर्गर किंग कंपनीने न्यायालयाकडे केली.

जुलै २०२४ मध्ये, पुण्यातील न्यायालयाने स्थानिक रेस्टॉरंटच्या बाजूने निर्णय दिला होता. कारण रेस्टॉरंट अगोदर पासून नाव वापरत आले होते. स्थानिक न्यायालयाने नमूद केले होते की, पुण्यातील रेस्टॉरंट १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून कार्यरत आहे, तर बर्गर किंग कॉर्पोरेशनने २००६ मध्ये फक्त भारतातील रेस्टॉरंट सेवांसाठी आपला ट्रेडमार्क नोंदणीकृत केला होता. बर्गर किंगने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT