'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव 
राष्ट्रीय

‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव ‘आयएनएस’च्या कार्यकारिणी सदस्यपदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील वृत्तपत्रे, मासिके आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘आयएनएस’च्या (इंडियन न्यूजपेपर सोसायटी) अध्यक्षपदी शुक्रवारी एम. व्ही. श्रेयम कुमार (मातृभूमी) यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी ‘पुढारी’ वृत्त समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची निवड झाली.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दूरद़ृश्य प्रणालीद्वारे झाली. त्यात 2024-25 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली. या बैठकीत विवेक गुप्ता (सन्मार्ग) यांची उपाध्यक्षपदी, करण दर्डा (लोकमत) उपाध्यक्षपदी आणि तन्मय माहेश्वरी (अमर उजाला) यांची मानद कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. श्रीमती मेरी पॉल या सोसायटीच्या सरचिटणीस आहेत. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या कार्यकारी समितीच्या इतर सदस्यांची निवडही यावेळी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT