professor proposes student bengaluru college file photo
राष्ट्रीय

Viral Video: मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाने वर्गातच विद्यार्थिनीला प्रपोज केले; तिने त्याला चपलेने मारले

professor proposes student bengaluru college: एका प्राध्यापकानेच आपल्या पदाची मर्यादा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Viral Video professor proposes student bengaluru college

बंगळूरू: एका प्राध्यापकानेच आपल्या पदाची मर्यादा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळूरूच्या उपनगरीय परिसरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने भर वर्गात विद्यार्थिनीला 'प्रपोज' केले. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने आणि तिच्या सहकाऱ्यांनी संबंधित प्राध्यापकाला चपलेने बदडत चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्गात लेक्चर सुरू असतानाच प्राध्यापकाने अचानक आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. हातात माईक घेऊन त्याने, "मला या बॅचमधील एका सर्वात महत्त्वाच्या मुलीला प्रपोज करायचे आहे," असे म्हणत त्या विद्यार्थिनीचे नाव घेतले. प्राध्यापकाच्या या कृत्यामुळे विद्यार्थिनीने तत्काळ आक्षेप घेतला आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.

व्हिडिओमधील धक्कादायक संवाद

व्हायरल व्हिडिओमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थिनी यांच्यातील वाद स्पष्टपणे ऐकू येत आहे:

प्राध्यापक: "तूच मला 'आय लव्ह यू' म्हणाली होतीस."

विद्यार्थिनी: "मी असे कधीच बोलले नाही. जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट प्राचार्यांकडे चला, संपूर्ण बॅच माझ्यासोबत येईल."

प्राध्यापक: "तू मला प्रपोज केल्याचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे."

विद्यार्थिनी: "मग दाखवा मला ते फुटेज!"

वाद वाढल्यानंतर प्राध्यापक "उद्या बोलूया" असे म्हणून वर्गाबाहेर जाऊ लागला. मात्र, संतप्त झालेली विद्यार्थिनी आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याला कॉलेजच्या आवारातच गाठले.

विद्यार्थिनींचा संताप आणि चप्पल काढून मारले

अपमानास्पद वागणुकीमुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने स्वतःच्या पायातील चप्पल काढून प्राध्यापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही त्याला चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॉलेजला भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT